शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आता थांबायचं नाही, महाराष्ट्रात २०० जागा जिंकू; फडणवीसांनी दिला कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 07:51 IST

विधान परिषदेच्या पराभवावर सुनावले खडे बोल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आपल्या नेत्यांमधील कार्यकर्ता मेला तर भाजपचा काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. नेते असाल तर नेत्यासारखे वागा, सर्वांना सामावून घ्यायला शिका, असे खडे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजप कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी बोलताना स्वपक्षीयांना सुनावले. अमरावतीमधील भाजपच्या पराभवाचा संदर्भ देत त्यांनी नेत्यांची कानउघाडणी केली. 

२०१४ पासून आपल्याला निवडणुका जिंकायची सवय लागली आहे. आपण एक निवडणूक हरलो तरी चर्चा होते. विदर्भातील आणि त्यातही अमरावतीतील (रणजित पाटील)  पराभवाचे आत्मचिंतन आपण केलेच पाहिजे. तीन हजार मतांनी आपला उमेदवार हरतो आणि त्या ठिकाणी सहा हजार बाद झालेली मते आपलीच असल्याचे दिसते. हे आत्मचिंतन करण्यासारखेच आहे. आपण सगळे नेते आहोत, नेत्यांनी नेत्यांसारखेच वागले पाहिजे; पण नेता हा नेताच राहिला आणि त्याच्यातील कार्यकर्ता मेला तर तो नेताही राहणार नाही. नरेंद्र मोदी हे आपले नेते आहेत; पण ते आजही संघटनेला पूर्णत: समर्पित, शरण आहेत. आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे. पक्षाला विचारल्याशिवाय ते कुठलाही निर्णय घेत नाहीत. आजही  प्रचारकासारखे जीवन जगतात. 

पक्षात इतरांना सामावून घ्यायला शिकले पाहिजे. ते सोडले तर आपल्यात आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक राहणार नाही. कार्यकर्त्यांना स्थान राहिले नाही म्हणून काँग्रेस पक्ष रसातळाला गेला, तसेच आपल्याकडे झाले तर आपलीही तीच गत राहील, असे फडणवीस यांनी बजावले. 

महाराष्ट्रात दोनशे जागा जिंकू !सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला येत्या दीड वर्षात पाच वर्षांची कामे करून दाखवायची आहेत. त्यासाठी ट्वेंटी-ट्वेंटी सारखी मॅच खेळणे सुरू झाले असून, २०२४ च्या निवडणुकीत दोनशे जागा जिंकूनच ही मॅच संपुष्टात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विजय डोक्यात जाऊ देऊ नका. एकमेकांना सोबत घेऊन समन्वयाने आपण पुढे गेलो तरच वारंवार जिंकू, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा