शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

... तर अजित पवार मुख्यमंत्री असते, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 08:22 IST

पवार दोन दिवस नाशिकमध्ये हाेते, त्यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबाबत सहकार मंत्री सावे यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, असे पक्षाच्या अनेक नेत्यांना वाटत असले तरी आमच्याकडे पुरेशी संख्या नाही, तसे असते तर सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. यावेळी त्यांनी भाजपने जेलमध्ये टाकण्यासंदर्भात महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांबाबत  विचार करण्याचा सल्लाही दिला.

पवार दोन दिवस नाशिकमध्ये हाेते, त्यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबाबत सहकार मंत्री सावे यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. राज्यातील सरकारची भूमिका केंद्र सरकारच्या सहकारविषयी विसंगत असल्याचे ते म्हणाले. केंद्राच्या सहकार परिषदेत सावेंचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही ते म्हणाले. कायदा, सुव्यवस्था बिघडली असल्याने याबाबत किती गंभीर आहेत, याबाबत शंका असल्याचा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला. 

भाजपने भूमिकेचा विचार करावामहाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केल्याचा राजकीय ठराव केल्याबाबत  पवार म्हणाले, अनिल देशमुख तुरुंगात होते. संजय राऊत यांनाही जेलमध्ये टाकले हाेते. या प्रकरणांत न्यायालयानेच काही आक्षेप नोंदविले. नवाब मलिक अजूनही जेलमध्ये आहेत. त्यामुळे भाजपने विधानाचा विचार करावा.

पंतप्रधान मोदी मुंबईत येत असतील आणि महाराष्ट्राला यातून काही मिळणार असेल तर हरकत नाही, पण जे राजकीय भाषण करत असतील तर त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. भाजप नेत्यांचे पुण्यात वाढलेले दौरे म्हणजे तेथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे काम चांगले सुरू असल्याचे लक्षण आहे.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईAjit Pawarअजित पवार