अभ्यास वर्गातून कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:49+5:302021-09-19T04:14:49+5:30

संगमेश्वर : आत्मपरीक्षण व आत्मा टीका करणारा कार्यकर्ता तयार करण्याचे काम येथे सुरू असलेल्या अभ्यासवर्गातून सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन ...

Ideological integration of activists from the study class | अभ्यास वर्गातून कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण

अभ्यास वर्गातून कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण

संगमेश्वर : आत्मपरीक्षण व आत्मा टीका करणारा कार्यकर्ता तयार करण्याचे काम येथे सुरू असलेल्या अभ्यासवर्गातून सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती मालेगावच्या वतीने गेली दोन वर्षांपासून संगमेश्वरातील गणेश वाचनालयात हा अभ्यास वर्ग सुरू आहे. या अभ्यास वर्गात कार्यकर्त्यांशी वैचारिक प्रबोधनपर चर्चा होते. कार्यकर्ता नुसता पुस्तक वाचून पोपटपंची करणारा न होता मुळापासून त्याला सर्व विषयांची जाण असावी यासाठी येथे प्रामुख्याने विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चा होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष परदेशी गेली दोन वर्षे नियमितपणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शनाचे काम करतात. पायाभूत विषयावर प्रामुख्याने यात चर्चा होते. मातृसत्ताक पद्धती, जाती संघर्ष ते सौंदर्यशास्त्र अशा सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, आर्थिक विषयावर येथे चर्चा घडवून आणली जाते. यात २० कार्यकर्ते सहभागी झाले. वैयक्तिक कारणाने ही संख्या १५पर्यंत स्थिरावली आहे. दर शनिवारी व रविवारी सायंकाळी अडीच ते तीन तास चर्चा व अभ्यासवर्ग रंगतो. कार्यकर्त्याला स्वत: प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करता आले पाहिजे. वैचारिकदृष्ट्या परिपक्व झाला पाहिजे. यासाठी येथे विशेष प्रयत्न केले जात असल्याचे अभ्यास वर्गाचे मार्गदर्शक परदेशी यांनी सांगितले. तरुण कार्यकर्त्यांबरोबरच तरुणींचाही यात सहभाग असतो हे विशेष. द्विवर्षपूर्तीनिमित्त इतिहासाचे अभ्यासक प्रा. श्रीमंत कोकाटे यांच्या उपस्थितीत नुकताच येथे कार्यक्रम पार पडला. अभ्यास वर्गात सहभागी विद्यार्थ्यांनी यावेळी अभ्यास वर्गातील अनुभव कथन केले. अभ्यासवर्ग अव्याहतपणे सुरू ठेवल्याबद्दल परदेशी यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. कोकाटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पुरोगामी चळवळीत कार्यकर्त्यांना प्रबोधनाची गरज असते. हे काम अभ्यास वर्गातून होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शहरातील राजेंद्र भोसले, डॉ. संदीप खैरनार, उमेश अस्मर, राष्ट्र सेवा दलाचे नचिकेत कोळपकर आदींचा या अभ्यास वर्गाला सक्रिय पाठिंबा असतो.

फोटो फाईल नेम : १७ एमएसई्पी ०५ . जेपीजी

फोटो

अभ्यास वर्गात सहभागी कार्यकर्त्यांसह राजेंद्र भोसले, डॉ. संदीप खैरनार, सुभाष परदेशी आदी.

Web Title: Ideological integration of activists from the study class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.