आदर्श माता-पिता प्रेरणा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:56 IST2018-03-27T00:56:24+5:302018-03-27T00:56:24+5:30

मुरारीनगर, अंबड येथील ज्ञानसंपदा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने एक कन्यारत्न असलेल्या आदर्श माता-पित्यांचा प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून व्याख्यात्या व सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर उपस्थित होत्या.

Ideal Parents Inspiration Award | आदर्श माता-पिता प्रेरणा पुरस्कार

आदर्श माता-पिता प्रेरणा पुरस्कार

सिडको : मुरारीनगर, अंबड येथील ज्ञानसंपदा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने एक कन्यारत्न असलेल्या आदर्श माता-पित्यांचा प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून व्याख्यात्या व सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर उपस्थित होत्या.  यावेळी सिडको, कामटवाडे, अंबड, सातपूर परिसरातील एक कन्यारत्न असलेल्या ३० परिवारांचा सन्मानचिन्ह, तुळशीरोप, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे ‘नातेसंबंध व आजची समाजव्यवस्था’ या विषयावर व्याख्या न संपन्न झाले. यावेळी रामतीर्थकर म्हणाल्या की, पती-पत्नीने अहंकार सोडून एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. हीच खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता आहे, असेही त्यांनी सांगितले.  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश भांड यांनी प्रास्ताविक केले. मनीषा महाजन यांनी स्वागत केले. याप्रसंगी व्यासपीठावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, प्रकाश कोल्हे, जितेंद्र कामतीकर, संतोष गाजरे, सुरेखा पाटील, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, सुवर्णा मटाले, आदी उपस्थित होते. उपीन सोनवणे यांनी आभार मानले.

Web Title: Ideal Parents Inspiration Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक