पंचवटी : पावसाने उघडीप दिल्यानंतर आखाड्याचे महंत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत जुन्या शाही मार्गाची पाहणी करणार आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत काही अडथळा निर्माण झाल्यास भाविकांना बाहेर पडण्याची सोय व्हावी, पाऊस राहिल्यास नाले ओसंडून वाहतील अशा परिस्थितीत पर्यायी शाही मार्ग म्हणून जुनाच शाही मार्ग उपयोगात येऊ शकतो. त्यासाठी पाहणी दौरा करण्यात येत आहे. प्रशासनाने तयारी म्हणून जुन्या शाही मार्गाची दुरुस्ती करावी. जुन्या शाही मार्गावर असलेले खड्डे बुजवावे. मंदिर, मठ वगळता असलेले अन्य अडथळे हटविण्याची योजना करणे गरजेचे आहे. लवकरच प्रशासनाचे अधिकारी साधू-महंत व आमदार यांच्या समवेत जुन्या शाही मार्गाचा पाहणी दौरा करणार असून, त्यादरम्यान जुन्या शाही मार्गात आढळणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करणार असल्याचे महंत ग्यानदास यांनी सागितले. (वार्ताहर)
...तर जुन्या शाही मार्गाचा विचार
By admin | Updated: July 28, 2015 01:07 IST