शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मैं पुरे इमानदारी से देश की सेवा करूंगा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 2:37 PM

गुरूवारी (दि.१२) केंद्राच्या संचलन मैदानावर उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. ४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत...

ठळक मुद्दे४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षणतुमची जात केवळ सैनिक आणि धर्म केवळ देशसेवा ‘सर्वत्र इज्जत वो इक्बाल’ हे ब्रीद वेळोवेळी सिध्द करा

नाशिक : ‘मैं दृढ प्रतिज्ञा करता हूं की, कानून द्वारा निश्चित किये गये भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहुंगा और मैं अपने कर्तव्य के अनुसार ईमानदारी और सच्चे मन से देशसेवा करुंगा...’ अशी शपथ मोठ्या आत्मविश्वासाने घेत भारतीय तोफखान्याच्या ३०४ जवानांनी (गनर) सशस्त्र संचलन करत डोळ्यांची पारणे फेडली.निमित्त होते, नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या शपथविधी सोहळ्याचे. गुरूवारी (दि.१२) केंद्राच्या संचलन मैदानावर उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. ४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित मुख्य अतिथी विशिष्ट सेवा पदक विजेते स्कूल आॅफ आर्टीलरीचे मेजर जनरल विनय धीमण उपस्थित होते. त्यांना तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर जे. एस. गोराया यांनी उमराव कवायत मैदानाच्या सलामीमंचावर लष्करी थाटात आणले. यानंतर धीमण यांनी शपथविधी सोहळ्याचे समीक्षण करत मैदानाची जीप्सीमधून पाहणी केली.केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी धीमण म्हणाले, आपल्या पूर्ण कारकिर्दीत आजचा दिवस सदैव स्मरणात ठेवा. तोफखाना केंद्राचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुमची जात केवळ सैनिक आणि धर्म केवळ देशसेवा असायला हवा. सकारात्मक आणि धर्मनिरपेक्ष विचाराने तुम्ही ‘तोपची’ म्हणून भारतीय सेनेत अभिमानास्पद कामगिरी करावी आणि आपल्या तोफखाना केंद्राचा नावलौकिक वाढवावा. मला विश्वास आहे, भविष्यात या तुकडीचे सर्व सैनिक आपली जबाबदारी चोखपणे बजावून केंद्राचे नाव उज्ज्वल करतील. आपला सैनिक धर्म व सैनिकी शिस्त कधीही विसरता कामा नये, असा गुरूमंत्रही त्यांनी यावेळी नवसैनिकांना दिला. तोफखान्याला ‘गॉड आफ वॉर’ असे म्हटले जाते, यावरून आपल्या दलाचे गांभीर्य सहज लक्षात येते. ‘सर्वत्र इज्जत वो इक्बाल’ हे ब्रीद वेळोवेळी सिध्द करण्याचा पुरेपुर प्रयत्न करावा, असे आवाहनही धीमण यांनी यावेळी केले.हे गनर ठरले उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीपरेड कमांडर संजीत काद्यान (अष्टपैलू कामगिरी), गनर मुक्तयार सिंह (शस्त्र हाताळणी), विष्णू वी (सुदृढ शारिरिक क्षमता), दीपक यादव (तंत्रज्ञ), हर्षदीप कुमार (रेडियो आॅपरेटर), लखविन्दर सिंह (उत्कृष्ट गनर), मदन कुमार (वाहनचालक), सेफमेस वदिया रामाकृष्णा यांना मेजर जनरल विनय धीमण, तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर जे. एस. गोराया यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पदक देऊन गौरव करण्यात आला. 

टॅग्स :NashikनाशिकIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत