शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

मला हवाय जन्म नवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:22 IST

कवयित्री डॉ. माधवी गोरे यांनी सादर केलेली ‘असं कोणीच विचारत नसतं, काय हवंय तुला? पण कोणी विचारले तर म्हणेन ‘मला हवाय जन्म नवा’ या स्त्री जीवन आणि वृक्षाच्या जीवनातील साम्य दर्शविणाऱ्या कवितेसह कवी संजय गोरडे यांची कोºया कोºया कपाळावर आणि ज्येष्ठ कवी राम पाठक यांच्या मुक्त छंदातील ‘काळोख कुळातील पोरी’ आदी कवितांनी नाशिकर रसिकांना भारावून टाकले.

ठळक मुद्देकुसुमाग्रज स्मरण : गझल, मुक्त छंदातील कवितांनी रसिक भारावले

नाशिक : कवयित्री डॉ. माधवी गोरे यांनी सादर केलेली ‘असं कोणीच विचारत नसतं, काय हवंय तुला? पण कोणी विचारले तर म्हणेन ‘मला हवाय जन्म नवा’ या स्त्री जीवन आणि वृक्षाच्या जीवनातील साम्य दर्शविणाऱ्या कवितेसह कवी संजय गोरडे यांची कोºया कोºया कपाळावर आणि ज्येष्ठ कवी राम पाठक यांच्या मुक्त छंदातील ‘काळोख कुळातील पोरी’ आदी कवितांनी नाशिकर रसिकांना भारावून टाकले.कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात ‘कुसुमाग्रज स्मरण’ अंतर्गत शुक्रवारी (दि. २८) कवी संमेलनात कवी संजय चौधरी, संजय गोरडे, डॉ. माधवी गोरे, प्रथमेश पाठक, नंदन रहाणे व राम पाठक यांनी त्यांच्या काव्य रचनांनी उपस्थितांची मने जिंकली. या काव्यमैफलीत कवी नंदन राहणे यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणाºया ‘दिला कोणी ना टोल एकही’ व लुबाडणारे लबाड करती निर्दय थट्टा या गझल शैलीतील काव्याचे सादरीकरण केले, तर राम पाठक यांनी ‘तू नकोस गुंफू वेणी’ गझल सादर करीत दाद मिळविली. त्यांच्या काळोख कुळातील पोरी या रचनेने संपूर्ण सभागृह गंभीर झाल्याचे दिसून आले. प्रथमेश पाठक यांनी धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला सामना करावा लागणाºया वाहतूक कोंडीवर आधारित ‘रस्त्यामधून चालत असता कविता धक्का देऊन जाते’ रचना सादर करतानाच विशेष मुरला नव्हतो तो कामात खाटकाच्या या गंभीर कवितेला रसिकांनी दाद दिली. क वी संजय चौधरी यांनी त्यांच्या खास शैलीत निवेदन करताना वेगवेगळे शेर, चारोळ्यांसोबतच कुसुमाग्रजांच्या काही रचनाही रसिकांना ऐकाविच त्यांची स्वत:ची ‘वयाची कविता’ व बाईने जेवढं झाकलं स्वत:ला या रचना सादर केल्या. अखेरच्या आवर्तनात क वयित्री डॉ. कवयित्री डॉ. माधवी गोरे यांनी देखो जब तूम आओगे या हिंदी रचनेसह ‘रोजचा नियम’ कवितेने सभागृहातील रसिकांना भावुक केल्याचे दिसून आले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक