वणी उपबाजारात कांद्याला विक्र मी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 17:04 IST2020-09-24T17:04:12+5:302020-09-24T17:04:48+5:30
वणी : वणी उपबाजारातआज कांद्याला तुलनात्मक ४२८८ रु पये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याने उत्पादकांचा उत्साह वाढला आहे.

वणी उपबाजारात कांद्याला विक्र मी भाव
वणी : वणी उपबाजारातआज कांद्याला तुलनात्मक ४२८८ रु पये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याने उत्पादकांचा उत्साह वाढला आहे.
२९५ वाहंनामधुन ६५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. ४२८८ रु पये कमाल ३००० रु पये किमान तर ३६५० रु पये सरासरी प्रति क्विंटल अशा दराने कांदा खरेदी विक्र ी पार पाडण्यात आली. तर गोल्टी स्वरु पाच्या दुय्यम दर्जाच्या कांद्याला बर्यापैकी दर मिळाला. २५०० रु पये कमाल १५०० रु पये किमान तर २००० रु पये सरासरी प्रति क्विंटलचा दर मिळाला.
निर्यातबंदीमुळे प्रारंभी काहीसा प्रतिकुल परिणाम झाला होता आता मात्र मागणीत स्थिरता जाणवु लागल्याने उत्पादकांचा उत्साह व अपेक्षा वाढल्या असुन व्यापारी वर्गाकडुनही सकारात्मक समन्वयात्मक भुमिका घेतली गेल्याने उलाढाल गतिमान झाली आहे.