मी ‘त्यांच्यापर्यंत’ पोहोचलोच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:44 IST2019-10-13T00:43:32+5:302019-10-13T00:44:18+5:30
बहुविधता ही आपली जगाला असलेली ओळख असून, ती कोणत्याही एका गटातटाची मक्तेदारी नाही किंबहुना ज्यांनी माझ्या अध्यक्षपदाला विरोध केला, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नसल्याची खंत असल्याचे प्रतिपादन ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे फादर दिब्रिटो यांचा सत्कार करताना उन्मेश गायधनी. समवेत रवींद्र मालुंजकर, अॅड. नितीन ठाकरे, लक्ष्मीकांत देशमुख, सुदाम सातभाई, प्रकाश पायगुडे, प्रसाद पवार.
नाशिक : बहुविधता ही आपली जगाला असलेली ओळख असून, ती कोणत्याही एका गटातटाची मक्तेदारी नाही किंबहुना ज्यांनी माझ्या अध्यक्षपदाला विरोध केला, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नसल्याची खंत असल्याचे प्रतिपादन ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले.
महाराष्टÑ साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेच्या वतीने फादर दिब्रिटो यांच्या निवडीबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. नाशिकरोडच्या जैन भवन येथे झालेल्या या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख तसेच परिषदेचे नाशिकरोड शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, अॅड. नितीन ठाकरे, प्रकाश पायगुडे, सुदाम सातभाई, रवींद्र मालुंजकर, प्रसाद पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना फादर दिब्रिटो यांनी, आपली प्रत्येकाची सर्व शक्ती ही आत्मशक्तीत असल्याचे सांगितले. आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.