शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव शाळेत जलसाक्षरता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 18:30 IST

नांदगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत जलशक्ती अभियान अंतर्गत जलसाक्षरता अभियानदिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी जलसाक्षरता शपथ घेतली.

ठळक मुद्देसायखेडा विद्यालयात जलदिंडी

देवगाव : नांदगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत जलशक्ती अभियान अंतर्गत जलसाक्षरता अभियानदिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी जलसाक्षरता शपथ घेतली. मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे जीवनातील महत्त्व व पाणी बचत याबद्दल मार्गदर्शन केले. उपशिक्षक प्रशांत तुपे यांनी विद्यार्थ्यांना पाणी बचत व शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी घोषणा फलक घेऊन गावात फेरी काढून जलसाक्षरता दिंडी काढली. शाळेजवळच शोषखड्डा करण्यात येऊन शाळेच्या खोल्यांना लोकसहभागातून पन्हाळीही बसविण्यात आलेली आहे. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. जलसाक्षरता अभियान यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रमेश सोनवणे, लहानू गावडे, अनिता वारूंगसे, जुबीन शाह, प्रशांत तुपे, अशोक गवळी, सुकरी भोये यांनी परिश्रम घेतले.सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जलशक्ती अभियानानिमित्त जलदिन, जलप्रतिज्ञा, जलदिंडी या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जल साक्षरतेवर प्राचार्य बी.के. सूर्यवंशी यांनी उद्बोधन केले. ते म्हणाले, आज पाणी जर वाचवले तरच भविष्यात आपले जीवन सुखी असेल अन्यथा पाण्याच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. यावेळी जलप्रतिज्ञा अशोक गावले यांनी विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली. यावेळी पर्यवेक्षक एम.एम. शिरसाट, रमेश अडसरे, श्रीमती जाधव, संजय चौधरी, अवधूत आवारे, राजेंद्र कदम, रामकृष्ण भामरे, अशोक टर्ले, अशोक गावले, सोमनाथ शिंदे, ज्ञानेश्वर कर्पे, शरद वाणी, विलास महाले, मोहन क्षीरसागर, किरण तांदळे उपस्थित होते. गावातून जलदिंडी काढण्यात आली. सायखेडा गावातील चौकाचौकातून जलदिंडी नेऊन जलसाक्षरतेचा संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला. दिंडीमध्ये शालेय पर्यावरण मंडळ, शालेय विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.सागपाडा शाळेत वृक्षदिंडीवणी-सापुतारा रस्त्यावरील सागपाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वृक्षदिंडी व वृक्षारोपण करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. बालवयोगटातील विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या. यावेळी बबिता सूर्यवंशी, पपू रेहरे, पवार, आरती दुबे, सुनीता पाटील, दिलीप चव्हाण, अंगणवाडीसेविका आशा कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाWaterपाणी