झोपड्या आल्या पुन्हा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:43 IST2020-10-14T23:47:05+5:302020-10-15T01:43:15+5:30
इंदिरानगर : वडाळा- पाथर्डी रस्त्यावरील शिवाजी वाडी लगतच्या झोपड्याचे अतिक्रमण पुन्हा वाढत चालले असून, त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

झोपड्या आल्या पुन्हा रस्त्यावर
इंदिरानगर : वडाळा- पाथर्डी रस्त्यावरील शिवाजी वाडी लगतच्या झोपड्याचे अतिक्रमण पुन्हा वाढत चालले असून, त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
वडाळा - पाथर्डी रस्त्याचे रुंदीकरण करताना या रस्त्यावर दुतर्फा असलेले अतिक्रमण पोलिसांच्या मदतीने काढण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यालगत असलेले साईनाथ नगर, विनय नगर, इंदिरानगर, सार्थक नगर, कला नगर सह विविध उपनगराना अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी जवळचा रस्ता तयार झाला आहे. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरु असते परंतु काही दिवसांपासून या भागात रस्त्यावर नव्याने झोपडे उभे करण्याच्या घटना वाढल्या असून, अतिक्रमण केल्यास महापालिकेच्या घरकुल योजनेत मोफत घरे मिळतात असा काहींचा समज झाल्यामुळे पुन्हा रस्त्यावर झोपड्या टाकण्यात येत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी दिवसागणिक रस्त्यावरील अतिक्रमण वाढत चालले असून, वाहतुकीसाठी रस्ता अरुंद पडत आहे.