Husband's wife's bloodless murder by her husband | कु-हाडीने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून
कु-हाडीने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून

गंगापूर : महादेवपूर येथील गट क्रमांक १२६मधील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या चंदर लक्ष्मण किरकिरे (रा.मूळ बेरवाळ) याने शनिवारी (दि.२५) सकाळी राहत्या खोलीत पत्नी दीपा चंदर किरकिरे हिचा कौटुंबिक भांडणातून कुºहाडीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फरार संशयित चंदरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेवपूर शिवारात शेतात पत्र्याच्या खोलीत अ‍ॅड. लक्ष्मण फकिरराव लांडगे यांच्या शेतावर रखवालदार म्हणून किरकिरे दाम्पत्य मागील सहा महिन्यांपासून राहत होते. संशयित चंदर याने रात्री भांडण करून पत्नी दीपा हिचा सकाळी १० वाजेच्या अगोदर कुºहाड व लोखंडी पाइपच्या सहाय्याने खून केला. यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला आहे. हा प्रकार सकाळी १० वाजेनंतर लांडगे यांच्या वाहनचालकामुळे उघडकीस आला. बारे देण्यासाठी वाहनचालक शेतात आला असता, पाणी घेण्यासाठी तो रखवालदार चंदर याच्या खोलीकडे आला. यावेळी खोलीचा दरवाजा बंद होता. त्याने दरवाजा वाजविला; मात्र आतमधून प्रतिसाद न आल्याने त्याने कडी उघडली असता दीपा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याला आढळून आली. त्याने तत्काळ घटना लांडगे यांना भ्रमणध्वनीवरून कळविली.


Web Title:  Husband's wife's bloodless murder by her husband
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.