शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या वाढदिवशीच पत्नीला ठार मारणारा पती तुरूंगात फोडणार खडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 14:15 IST

भाजी कापण्याच्या चाकू उचलून तिच्या पोटात खुपसला. यापाठोपाठ गळ्यावरही सपासप वार केले. आरडओरड कानी आल्याने त्याचा भाऊ राहूल शिंदे याने धाव घेतली असता आरोपीने त्यास धक्का मारून घटनास्थळावरून पोबारा केला होता.

ठळक मुद्दे गळ्यावरही सपासप वार केले.सारीपुत्रविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून लग्नाच्या वाढदिवशी आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करून ठार मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी.गिमेकर यांनी जन्मठेप व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना ३ मे २०१८ साली सिडको परिसरात घडली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू होता.सिडकोमधील पंडीतनगरमध्ये राहणारा आरोपी सारीपुत्र पुंजाराम शिंदे याने त्याची पत्नी रमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. गवंडी काम करणारा सारीपुत्र रमा माहेरच्यांशी नेहमीच फोन वर बोलत असल्याने तीच्यासोबत वाद घालत होता. यावेळी तो तिला जीवे ठार मारण्याची धमकी द्यायचा. ३ मे २०१८ रोजी लग्नाचा वाढिदवस असल्याने दुपारी हे दांम्पत्य आपल्या खोलीत असताना ही घटना घडली होती. आरोपी सारीपुत्र व रमा दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या खोलीतील पलंगावर बसलेले असतांना त्याने पत्नीस अनैतिक संबधाबाबत विचारणा केल्याने दोघांमध्ये वाद झाला. यावेळी रमाने त्यास चांगलेच खडसावल्याने संतप्त झालेल्या सारीपुत्रने जवळच पडलेला भाजी कापण्याच्या चाकू उचलून तिच्या पोटात खुपसला. यापाठोपाठ गळ्यावरही सपासप वार केले. आरडओरड कानी आल्याने त्याचा भाऊ राहूल शिंदे याने धाव घेतली असता आरोपीने त्यास धक्का मारून घटनास्थळावरून पोबारा केला होता. या घटनेत रमा जागीच ठार झाल्याने राहूल शिंदे याने दिलेल्या तक्र ारीवरून अंबड पोलीसांनी आरोपी सारीपुत्रविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एस.बी.खडके यांनी करून आरोपीच्या मुसक्या आवळून न्यायालयापुढे हजर क रत दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात विशेष सरकारी वकिल रविंद्र निकम यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने परिस्थीतीजन्य आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्यांच्या आधारे आरोपी सारीपुत्र यास दोषी धरले व जन्मठेप आण २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयMurderखून