दारु पिण्यासाठी कमी पैसे दिल्याने पतीने केला पत्नीचा कुºहाडीने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:53 IST2020-08-18T21:32:29+5:302020-08-19T00:53:33+5:30

निफाड : पत्नीकडे दारुसाठी १०० रु मागितले, परंतु तीने फक्त ५० रु पये देईल असे पत्नीने सांगितल्याने त्याचा राग येऊन पतीने पत्नीवर कुºहाडीचा वार केल्याने तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

Husband kills wife with ax for paying less for alcohol | दारु पिण्यासाठी कमी पैसे दिल्याने पतीने केला पत्नीचा कुºहाडीने खून

दारु पिण्यासाठी कमी पैसे दिल्याने पतीने केला पत्नीचा कुºहाडीने खून

ठळक मुद्देया घटनेनंतर वसंत हा फरार झाला असून निफाड पोलीस त्याचा शोध घेत आहे.

निफाड : पत्नीकडे दारुसाठी १०० रु मागितले, परंतु तीने फक्त ५० रु पये देईल असे पत्नीने सांगितल्याने त्याचा राग येऊन पतीने पत्नीवर कुºहाडीचा वार केल्याने तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
निफाड येथील बेघर वस्ती येथे संशयित आरोपी वसंत नामदेव पवार हा कुटुंबासह राहतो. वसंत पवार हा लाकूड तोडण्याचे काम करतो, तर त्याची पत्नी द्वारकाबाई ही शेतमजुरी करीते. सोमवारी (दि.१७)द्वारकाबाई हिला मजुरीचे पैसे मिळाल्याचे समजल्याने पती वसंत याने तीच्याकडे १०० रुपयांची मागणी केली. मात्र तीने फक्त ५० रु पये देईल असे सांगितल्याने त्याला राग आला. त्यानंतर रात्री पत्नी झोपल्यानंतर वसंत याने कुºहाडीने डोक्यात घाव घातला यात तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर वसंत हा फरार झाला असून निफाड पोलीस त्याचा शोध घेत आहे.
याबाबत मयत द्वारका हिचा मुलगा आनंद वसंत पवार याने निफाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित आरोपी वसंत पवार याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वारु ळे, पोलीस हवालदार नितीन मंडलिक, सतीश बैरागी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पगार, मनोज आहेर, बाबासाहेब राठोड हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Husband kills wife with ax for paying less for alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.