विवाहिता आत्महत्त्या प्रकरणी पती अन् पे्रयसीस कारावास

By Admin | Updated: September 4, 2014 00:44 IST2014-09-04T00:36:49+5:302014-09-04T00:44:48+5:30

विवाहिता आत्महत्त्या प्रकरणी पती अन् पे्रयसीस कारावास

Husband and Pereis imprisonment in case of marital suicide | विवाहिता आत्महत्त्या प्रकरणी पती अन् पे्रयसीस कारावास

विवाहिता आत्महत्त्या प्रकरणी पती अन् पे्रयसीस कारावास



लासलगाव : पतीच्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने झालेल्या शारीरिक व मानसिक छळाला वैतागून समीना शफीक शेख या विवाहितेस आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचे आरोपावरुन पती व त्याच्या
प्रेयसीला निफाड येथील जिल्हा व
सत्र न्यायाधीश अ.ज.मंत्री यांनी ५
वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
येवला तालुक्यातील पारेगाव येथील राहणाऱ्या शफीक मुस्तफा शेख याचे शेतात शेतमजुरीस येणाऱ्या नजमा रज्जाक या विधवा महिलेशी अनैतिक संबंध सुरू झाले. त्यास त्याची पत्नी समीना शफीक शेख (३१) ही त्यांना विरोध करीत असल्याने तीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. या त्रासाला वैतागून तिने ३० जुलै २०११ रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केली.
या घटनेनंतर मयत समीनाचा भाऊ खलील अनिस मोमीन याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून येवला शहर पोलिसांनी पती शफीक शेख व नजमा रज्जाक पठाण यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यात जिल्हा सहाय्यक सरकारी वकील यू. डी. गवांदे यांनी सरकार पक्षाच्यावतीने पाच साक्षीदार तपासले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश अ.ज.मंत्री यांनी संशयीत शफीक शेख यास पाच वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड व दंड न दिल्यास ६ महीने कारावास सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड न दिल्यास ३ महीने कारावास तर नजमा रज्जाक पठाण हीस पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड न दिल्यास ३ महीने कारावास अशी शिक्षा ठोठावली. (वार्ताहर)

Web Title: Husband and Pereis imprisonment in case of marital suicide