शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

देवळा तालुक्यात कोरोना बाधितांची शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:23 PM

देवळा : तालुक्यात तीन दिवसात शंभर कोरोना रुग्ण आढळून आले असून रुग्ण वाढीचा हा वेग प्रशासनाला चिंतेत टाकणारा असला तरी नागरिक मात्र अद्यापही बेफिकिर असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून आदेशांची अंमलबजावणी

देवळा : तालुक्यात तीन दिवसात शंभर कोरोना रुग्ण आढळून आले असून रुग्ण वाढीचा हा वेग प्रशासनाला चिंतेत टाकणारा असला तरी नागरिक मात्र अद्यापही बेफिकिर असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील भऊर, मेशी, लोहोणेर, दहिवड, देवळा, कनकापूर आदी गावात मार्च महिन्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. देवळा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देवळा नगरपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशान्वये देवळा शहरात निर्बंध लागू केले आहेत.

यापुढे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ या कालावधीतच सुरु राहणार असून शनिवार व रविवारी दुकाने बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, दुध, व वृत्तपत्रे वितरण या बाबींना हे नियम लागू राहणार नाहीत. लग्न समारंभ व इतर समारंभासाठी नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांची परवानगी घेणे अनिवार्य राहील. दि.१५ पासून लॉन्स ,मंगल कार्यालय, हॉल व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ तसेच इतर कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत पू र्णपणे बंद राहतील.

खाद्यगृहे , परमिट रुम/बार ५० टक्के टेबल क्षमतेने सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच धार्मिक स्थळे शनिवार व रविवार या दिवशी बंद राहतील आदी निर्बंध घालण्यात आले आहेत.

देवळा शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे शनिवारी व रविवारी सर्व दुकाने बंद होती. सोमवारी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यात आली, परंतु सायंकाळी ७ वाजता एकही दुकान बंद झाले नाही. अखेर पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर दुकाने तातडीने बंद झाली.

अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या. यानंतर सर्व रस्ते सुनसान झाले. रात्री पाच कंदील चौकात येणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी झाली.नागरिकांनी आता कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य