मायको प्रसूतीगृहात शंभर खाटांचे रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:45 IST2018-08-19T00:45:08+5:302018-08-19T00:45:35+5:30

महापालिकेच्या वतीने सातपूर येथील मायको प्रसूतिगृहाचे रुग्णालयात रूपांतर करण्यात येणार असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

Hundred beds in the maiden maternity hospital | मायको प्रसूतीगृहात शंभर खाटांचे रुग्णालय

मायको प्रसूतीगृहात शंभर खाटांचे रुग्णालय

नाशिक : महापालिकेच्या वतीने सातपूर येथील मायको प्रसूतिगृहाचे रुग्णालयात रूपांतर करण्यात येणार असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने सध्या या प्रसूतीगृहात केवळ वीस खाटा असून अन्य कोणतेही उपचार केले जात नाही, परंतु आता महापालिकेनेच याठिकाणी केंद्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत शंभर खाटांचे रुग्णालय मंजूर केले असून त्यासाठी दहा कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. त्यातील पाच कोटी रूपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या रुग्णालयात अन्य आजारांवरदेखील उपचार करणे शक्य होणार आहे.

Web Title: Hundred beds in the maiden maternity hospital