घरफोडीत दीड लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:04 IST2018-02-11T01:04:45+5:302018-02-11T01:04:45+5:30
नाशिक : कैलास मोहन मोरे यांचे बंद घरामध्ये चोरट्यांनी प्रवेश करून एक लाख ४७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली.

घरफोडीत दीड लाखांचे दागिने लंपास
नाशिक : जयभवानी रोडवरील अर्पण रेसिडेन्सीमधील कैलास मोहन मोरे यांचे बंद घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून एक लाख ४७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या परिसरात झालेल्या घरफोडीत २२ ग्रॅम व १४ ग्रॅमच्या सोनसाखळ्या, सात ग्रॅमची सोन्याची वेल, साडेसात ग्रॅमचे कर्णफुलांचे दोन जोड, आठ ग्रॅमचे सोन्याचे दोन मंगळसूत्र असे एकूण एक लाख ४७ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.