शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

शहर-ग्रामीण पोलिसांचे हुक्का पार्लरकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:54 IST

नाशिक शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेजरोड, गंगापूररोड यांसह ग्रामीणमधील नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीतील विविध हॉटेल्समध्ये सर्रास हुक्का पार्लर सुरू झाले आहेत़

नाशिक : नाशिक शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेजरोड, गंगापूररोड यांसह ग्रामीणमधील नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीतील विविध हॉटेल्समध्ये सर्रास हुक्का पार्लर सुरू झाले आहेत़ विशेष म्हणजे शहर पोलिसांनी कॉलेजरोड तर ग्रामीण पोलिसांनी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील हुक्का पार्लर चालविणाºया हॉटेलांवर कारवाई केल्याचा दिखावा केला़ मात्र, त्यानंतर ही कारवाई थंडावली असून, पार्लर चालू ठेवण्यासाठी अर्थपूर्ण गणितात मोठी वाढ केल्याची चर्चा आहे़  गत काही वर्षांपासून शहरात हुक्का पार्लरचे पेव फुटले असून, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच तरुण त्यातही विशेषत: तरुणी व्यसनाकडे वळल्या आहेत. शहर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी हुक्का पार्लरवर जोरदार कारवाई केली, मात्र त्यानंतर ती बंद पडल्याने हे हुक्का पार्लर पुन्हा सुरू झाले असून, याबाबत पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़ तर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील चांदशी, गंगापूर, गिरणारे आदी परिसरातील हॉटेल्समध्ये केवळ हुक्काच नव्हे तर अमली पदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे़शहरात पोलीस आयुक्त तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक कायदा व सुव्यवस्था तसेच अवैध व्यवसायांना लगाम बसावा यासाठी प्रयत्नशील आहेत़ तर दुसरीकडे हुक्का पार्लर सुरू असलेल्या हद्दीतील पोलीस अधिकारी विशेषत: वसुली अधिकारी या अवैध व्यवसायांना खतपाणी घालून परवानगी देत असल्याची चर्चा खुद्द पोलीस कर्मचाºयांमध्ये आहे़ पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील व त्यांच्या पथकाने काही महिन्यांपूर्वीच म्हसरूळ तसेच शहरातील विविध परिसरातील हॉलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई केली होती़ या कारवाईमुळे तरुणांना व्यसनास लावणाºया या हुक्का पार्लरवर लगाम बसेल अशी अपेक्षा होती़ग्रामीण भागातही सुरूहुक्का पार्लरमध्ये महाविद्यालयीन युवतींचा मोठा सहभाग असल्याचे तसेच याठिकाणी मद्यपानही केले जात असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आले होते. नाशिक शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड, अंबड यांसह पोलीस आयुक्तालयातील मोजक्या हॉटेलात तर ग्रामीणमध्ये चांदशी, गिरणारे, कश्यपी डॅम आदी ठिकाणी हे हुक्का पार्लर सुरू असल्याचे चित्र आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय