मानुरगावात गुदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST2021-03-18T04:15:08+5:302021-03-18T04:15:08+5:30

जेलरोड गोदावरी नदीजवळील मानूर गावात विजय चौहाण यांचा विविध कंपन्यांचा माल असलेले पत्र्याचे मोठे गुदाम आहे. मंगळवारी रात्री अडीच ...

A huge fire broke out in a warehouse in Manurgaon | मानुरगावात गुदामाला भीषण आग

मानुरगावात गुदामाला भीषण आग

जेलरोड गोदावरी नदीजवळील मानूर गावात विजय चौहाण यांचा विविध कंपन्यांचा माल असलेले पत्र्याचे मोठे गुदाम आहे. मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे गुदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. गुदामामधील माल वेगाने जळू लागल्याने व पत्र्याचा आवाज येऊ लागल्याने आग लागल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आले. रहिवाशांनी आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. मनपा अग्निशमन दलाला माहिती मिळताच शहराच्या विविध अग्निशामक केंद्रातुन घटनास्थळी आग विझविण्यासाठी बंब दाखल झाले. गुदामामध्ये मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांचा माल असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. रात्री अंधारामुळे आग विझविण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. अग्निशामक दलाने रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. परंतु गुदामामध्ये मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांचा माल असल्याने बुजलेली आग पुन्हा काही वेळाने भडकत असल्याने बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत अग्निशामक दलाचे बंब आग विझविण्याचे प्रयत्न करत होते. परंतु आग आटोक्यात आली नव्हती. आगीत गोडाऊन मधील कोट्यावधी रुपयाचा माल जळून भस्मसात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवीतहानी टळली. गुदामाला लागलेल्या भीषण आगीमुळे गावातील नागरिकांत घबराट पसरली होती.

---

फोटो आर वर १७मानूर नावाने सेव्ह

Web Title: A huge fire broke out in a warehouse in Manurgaon