शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
3
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
4
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
5
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
6
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
7
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
8
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
9
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
10
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
11
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
12
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
13
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
15
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
16
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
17
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
18
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
19
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
20
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
Daily Top 2Weekly Top 5

सायखेडा बाजार समितीत कांद्याची प्रचंड आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:07 IST

अनेक दिवसांपासून बंद असलेल्या सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले आणि यंदाच्या हंगामातील विक्रमी आवक बाजार समितीत पाहायला मिळाली. आवारात ४४६ पिकअप व ११९ ट्रॅक्टर इतकी प्रचंड आवक झाल्याने बाजार समिती आवाराला जत्रेचे स्वरूप आले होते. शेतकऱ्यांच्या प्रचंड गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : विक्रीसाठी लगीनघाई

सायखेडा : अनेक दिवसांपासून बंद असलेल्या सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले आणि यंदाच्या हंगामातील विक्रमी आवक बाजार समितीत पाहायला मिळाली. आवारात ४४६ पिकअप व ११९ ट्रॅक्टर इतकी प्रचंड आवक झाल्याने बाजार समिती आवाराला जत्रेचे स्वरूप आले होते. शेतकऱ्यांच्या प्रचंड गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला.कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, उन्हाळी कांद्याला सरासरी ९०० रुपये भाव मिळाला तर लाल कांद्याला सरासरी ६५० रुपये इतका भावे मिळाला. अनेक दिवसांपासून सायखेडा बाजार समितीतील कांदा लिलाव बंद होता. व्यापाऱ्यांनी स्वरक्षणासाठी कांदा लिलाव बंद ठेवला होता तर अनेक व्यापाºयांची इच्छा असूनही अनेक मजूर कामावर येत नसल्याने लिलाव बंद होते. परिसरातील सर्व कांदा शेतकºयांनी काढून तयार ठेवला होता. बाजार समितीच्यावतीने कांदा लिलाव सुरू होत असल्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले होते. त्यामुळे कांदा आवक प्रचंड प्रमाणात वाढली.राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाउनमुळे कांदा लिलाव पुन्हा बंद होऊ शकतो या भीतीने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी वाहने आणली होती. त्यामुळे पहाटे ३ वाजेपासून बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टर, पिकअप यांची रिघ लागली होती. सायखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने वारंवार सूचना देऊन गर्दी पांगवण्यात येत होती तरीदेखील शेतकरी टोळ्याटोळ्यांनी उभे राहत होते. पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी अनेकदा काठीचा वापर करावा लागला. बाजार समितीच्या वतीने प्रत्येक चालकाच्या हाताला सॅनिटायझर लावूनच आत सोडण्यात येत होते तर बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टरने सोडियम क्लोराइडची फवारणीदेखील करण्यात आली. सायखेडा बाजार समितीत कांदा लिलाव सातत्याने व्यापारी बंद ठेवतात. त्यामुळे कांदा शेतात थोपवून राहातो. लिलाव एकदा सुरू झाली की प्रचंड आवक निर्माण होते. आवक कमी व्हावी यासाठी दररोज कांदा लिलाव सुरू ठेवावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड