ह.भ.प. सखाराम बागुल यांचे अपघाती निधन

By Admin | Updated: December 22, 2016 00:44 IST2016-12-22T00:44:23+5:302016-12-22T00:44:35+5:30

ह.भ.प. सखाराम बागुल यांचे अपघाती निधन

H.P.P. Sakharam Bagul passes accident | ह.भ.प. सखाराम बागुल यांचे अपघाती निधन

ह.भ.प. सखाराम बागुल यांचे अपघाती निधन

लोहोणेर : देवळा तालुक्यातील अहेर वस्ती येथील हरिनाम सप्ताहाच्या काकड आरतीला जात असताना सरस्वतीवाडी शिवारातील मेधणे वस्तीजवळील बाडमेर हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने नांदुरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी व प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. डॉ. सखाराम दादाजी बागुल (५५, रा. माळवाडी) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, तीन भाऊ व नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी (दि. २१) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सरस्वतीवाडी (अहेरवस्ती) येथे डॉ. सखाराम बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. दि. २१ रोजी पहाटेच्या काकडा आरतीसाठी डॉ. बागुल मोटारसायकलने (एमएच ४१ एन ५३२८) अहेरवस्तीच्या दिशेने जात होते. बाडमेर हॉटेलच्या समोर त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर जोरदार फेकले गेले. त्यांना तत्काळ देवळा ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक उपचार करून मालेगाव येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्यातच त्यांचे निधन झाले.

Web Title: H.P.P. Sakharam Bagul passes accident