शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासांच्या कर्तव्यानंतर शाळेत कसे पोहोचणार : शिक्षकांचा सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 17:03 IST

जिल्ह्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान होत असून या निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली आहे. परंतु, या सर्व शिक्षकांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शाळेत हजर राहावे लागणार आहे.त्यामुळे जवळपास ४८ तासाच्या अविरत कर्तव्यानंतर शाळेत कसे पोहोचणार असा सवाल उपस्थित करीत शिक्षकांना निवडणुकीच्या दिसऱ्या दिवशी सुटी मिळावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागणीला कोणताही प्रतिसादन दिला नसून निवडणुकीच्या जबाबदारीवर असलेल्या सर्व शिक्षकांना मंगळवारी शाळेत उपस्थित राहवे लागणार आहे. 

ठळक मुद्देशासकीय, अनुदानित शिक्षकांवर मतदान प्रक्रियेची जबाबदारीनिवडणूक कामानंतर तत्काळ शाळेत हजर राहावे लागणार सुट्टीची मागणी मान्य न झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी

 नाशिक : जिल्ह्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान होत असून या निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांचीनिवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली आहे. परंतु, या सर्व शिक्षकांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शाळेत हजर राहावे लागणार आहे.त्यामुळे जवळपास ४८ तासाच्या अविरत कर्तव्यानंतर शाळेत कसे पोहोचणार असा सवाल उपस्थित करीत शिक्षकांना निवडणुकीच्या दिसऱ्या दिवशी सुटी मिळावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागणीला कोणताही प्रतिसादन दिला नसून निवडणुकीच्या जबाबदारीवर असलेल्या सर्व शिक्षकांना मंगळवारी शाळेत उपस्थित राहवे लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या धोरणाप्रमाणे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांची नेमणूक त्यांच्या मुख्यालयापासूनच्या दूर असलेल्या तालुक्यांत करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदानप्रक्रिया सोमवारी (दि.२९) आहे. परंतु सर्व कर्मचाऱ्यांना नियमांप्रमाणे निवडणुकीच्या एक दिवस अगोदर म्हणजे रविवारी (दि.२८) सकाळी ८ वाजेच्या आत नियुक्त तालुक्याच्या स्थळी पोहोचण्याठी रवाना व्हावे लागणार आहे. दुसऱ्या दिवशी मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर तालुका स्तरावर साहित्य जमा केल्यानंतर कर्मचारी तेथेच मुक्काम करतील किंवा काही कर्मचारी घरी जाण्यासाठी रवाना होतील, इतक्या उशिरा घरी जाण्यासाठी बस, गाडी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असते. कितीही प्रयत्न केला तरी कर्मचारी मंगळवारी (दि.३०) पहाटे किंवा सकाळी त्यांच्या मुख्यालयी लवकर पोहचू शकत नाही. सध्याच्या स्थितीत जिल्हा परिषद शाळांची वेळ सकाळी ७.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत अशी आहे, या परिस्थितीत शिक्षक सलग ४८ तासांच्या कर्तव्यावरून परतून पुन्हा सकाळी ७ वाजता शाळेवर जाणे शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त सर्व शिक्षकांना मंगळवारी (दि.३०) कामावर अनुपस्थित राहण्याची परवानगी अर्थात रजा मंजूर करण्यात यावी व त्यासंबंधीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र शिक्षकांच्या मागणीला प्रशासनाकडून रविवारी सायंकाळपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शिक्षकांना निवडणुकीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा नियमितपणे आपल्या शाळेत उपस्थित राहवे लागणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNashikनाशिकElectionनिवडणूकzpजिल्हा परिषदSchoolशाळाTeacherशिक्षक