‘स्मार्ट’वाळवी आणखी किती काळ पोखरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST2021-09-21T04:17:37+5:302021-09-21T04:17:37+5:30

सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रोेजेक्ट गोदाचा आहे. नदीपात्रालगत कोट्यवधी रुपयांची कामे करताना कुणा तज्ज्ञाचा सल्ला नाही की स्टेक होल्डर नाशिककरांचा ...

How much longer will the ‘smart’ sandpiper last? | ‘स्मार्ट’वाळवी आणखी किती काळ पोखरणार?

‘स्मार्ट’वाळवी आणखी किती काळ पोखरणार?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रोेजेक्ट गोदाचा आहे. नदीपात्रालगत कोट्यवधी रुपयांची कामे करताना कुणा तज्ज्ञाचा सल्ला नाही की स्टेक होल्डर नाशिककरांचा सल्ला घेतलेला नाही. गोदावरी नदीला पूर कुठे आणि कसा येतो हे माहिती नसलेल्या कुठल्या तरी कंपन्यांनी परस्पर केलेले नियेाजन किती टिकणार? पहिल्या पावसात सर्व फरशा वाहून गेल्या आहेत.

अंदाजपत्रक समितीने केवळ वरवर प्रश्न उपस्थित केले. त्यात खोलवर हात घातला की काय काय हाती लागेल हे सांगता येत नाही पंतप्रधांनाचा हा स्वप्न प्रकल्प म्हणून प्रकल्पाच्या आधी निधी येऊन पडला. मात्र कामांची गती स्मार्ट नाही. इतकेच नव्हे तर निधीचा विनियोग कसा झाला याचेच ऑडिट करण्याची गरज अहो. दुर्दैवाने कंपनी ॲक्ट खाली कारभार दडवला जात आहे आणि शासकीय ऑडिट करण्याची तरतूद नाही असे सांगितले जात आहे. मात्र, गरज आहे शासकीय ऑडिटची. त्यातून खरा कारभार बाहेर येईल. मात्र अंदाजपत्रक समिती हे सर्व करणार काय?

- संजय पाठक,

Web Title: How much longer will the ‘smart’ sandpiper last?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.