सरस्वती, शारदा देवीने किती शाळा काढल्या? भुजबळांचा सवाल; म्हणाले, माझे देव फुले, शाहू, आंबेडकरच

By श्याम बागुल | Published: August 19, 2023 05:33 PM2023-08-19T17:33:42+5:302023-08-19T17:33:55+5:30

 मराठा विद्या प्रसारक शिक्षण समाज संस्थेच्या समाजदिनानिमित्त मखमलाबाद येथील शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.

How many schools did Saraswati, Sarada Devi take Question of Bhujbal Said, My God is Phule, Shahu, Ambedkar | सरस्वती, शारदा देवीने किती शाळा काढल्या? भुजबळांचा सवाल; म्हणाले, माझे देव फुले, शाहू, आंबेडकरच

सरस्वती, शारदा देवीने किती शाळा काढल्या? भुजबळांचा सवाल; म्हणाले, माझे देव फुले, शाहू, आंबेडकरच

googlenewsNext

नाशिक : सामान्यांना शिक्षणाचा अधिकार महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराजांनी मिळवून दिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा कायदा करून साऱ्यांनाच शिक्षणाचे कवाडे उघडी केली. त्यामुळे तेच माझे दैवत असून, सध्या जे काही लोक सरस्वती, शारदा देवीची प्रतिमा पुजन करतात. त्यांनी किती शाळा काढल्या व किती लोकांना शिक्षण दिले असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. आपला देवांना विरोध नाही, ज्यांना पुजन करायची त्यांनी करावी मी मात्र माझ्या दैवतांचेच पूजन करू असेही ते म्हणाले.

 मराठा विद्या प्रसारक शिक्षण समाज संस्थेच्या समाजदिनानिमित्त मखमलाबाद येथील शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दोनशे वर्षापुर्वी दिड टक्के ब्राह्मणांच्या ताब्यात शिक्षण व्यवस्था होती. महिलांना देखील शिकण्यास बंदी होती. अन्य समाज सारा अशिक्षीत. त्यामुळे त्यांचे हक्क काय, अधिकार काय कोणालाच ठावूक नव्हते. तक्रार तरी कोणाकडे करायची? तक्रार तेच घेणार, तेच लिहीणार आणि निकालही तेच देणार अशी परिस्थिती असतांना महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यात शाहू महाराजांनी पुढाकार घेतला व आपले सर्वस्व अर्पण केले. अशा व्यक्तींच्या फोटोंचे पुजन झाले पाहिजे ही आपली भूमिका आजही कायम असल्याचे भुजबळ यांनी ठासून सांगितले.

Web Title: How many schools did Saraswati, Sarada Devi take Question of Bhujbal Said, My God is Phule, Shahu, Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.