शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Chhagan Bhujbal : "देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं त्या दत्तू भोकनळ, कविता राऊत, अंजना ठमकेंना नोकरी द्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 14:35 IST

Chhagan Bhujbal : "सरकारी, निम सरकारी नोकरी देताना ऑलम्पिक संघाची मान्यता लागते. याचा तात्पुरता भावनिक विचार करून चालणार नाही, त्याने गोविदांची देखील फसवणूक केल्यासारखे होईल."

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना आता क्रीडा कोट्यातील ५ टक्के शासकीय नोकरीत आरक्षणचा लाभही मिळणार असल्याचं सांगितलं. या निर्णयानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत सरकारला सोशल मीडियात ट्रोल केलं. यानंतर अनेकांनी देखील यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "गोविंदांना नोकरीत आरक्षण नेमकं कसं देणार? काय निकष लावणार?" असा सवाल विचारला आहे. 

"सरकारी, निम सरकारी नोकरी देताना ऑलम्पिक संघाची मान्यता लागते. याचा तात्पुरता भावनिक विचार करून चालणार नाही, त्याने गोविंदांची देखील फसवणूक केल्यासारखे होईल. आरक्षण असतानाही आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अद्याप सरकारी नोकरी नाही. ज्यांनी देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं, त्या दत्तू भोकनळ, कविता राऊत, अंजना ठमके यांना नोकरी द्या. पण त्यांना अद्याप नोकरी नाही. गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र आहे त्यांना आधी न्याय द्या" असं म्हणत भुजबळ यांनी निशाणा साधला आहे. 

"शरद पवार अब्दुल सत्तार यांना भोंग्यांचे मार्गदर्शन करणार नाही, शरद पवार सत्तार यांना पीक पाणी, पीक विमा, पद्धती याबाबत नक्की मार्गदर्शन करतील" असंही म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांना लवकर मदतीसाठी केवळ कृषीच नाही, तर सर्व विभागांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. संकट खूप मोठं, ओला दुष्काळ जाहीर करा. केवळ विरोधी पक्षांनी मागणी केली म्हणून नकार देण्याचं काहीही कारण नाही" असं छगन भुजबळ यांनी म्हटलं  आहे. 

आदित्य ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यावर बोलताना "नवीन युवक, नवीन नेते राज्यात फिरत असतील, तर चांगली गोष्ट शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांच्यात पोस्टर काळे फासणे, फाडणे या गोष्टी सुरू राहतील. खरा कौल निवडणुकीत जनता देईल" असं सांगितलं. तसेच मुंबईला हल्ल्याची धमकी मिळाली आहे याबाबत सतर्कता बाळगावी लागेल अशा धमक्या येतात तेव्हा त्याचं विश्लेषण दिल्लीपासून मुंबई आणि पोलिसांच्या वेगवेगळ्या यंत्रणा करत असतात असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक