येवल्यात शॉर्ट सर्किटने घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:32+5:302021-03-13T04:26:32+5:30
गुरुवारी, (दि. ११) दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील आईना मशीद भागात सदर घटना घडली. घरावरील वीज तारांचा शॉर्ट सर्किट ...

येवल्यात शॉर्ट सर्किटने घराला आग
गुरुवारी, (दि. ११) दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील आईना मशीद भागात सदर घटना घडली. घरावरील वीज तारांचा शॉर्ट सर्किट होऊन शहजादी चाँदखाँ पठाण, जहागीर पठाण यांचे घराला आग लागली. या आगीने घरातील दोन गॅस टाक्यांचा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज व धुराचे उठणारे लोळ पाहून परिसरातील लोक मदतीसाठी धावून आले. नगरपालिकेचा अग्निशमन बंबही घटनास्थळी तत्काळ दाखल झाला. अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्यास यश आले. मात्र, सदर आगीत दोन घरांसह लगतच्या घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील मंडळी बाजार निमित्ताने बाहेर गेलेले असल्याने जीवितहानी टळली.
फोटो- ११ येवला फायर
येवला येथे आईना मशीद भागात घराला लागलेली आग.