सटाणा : तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मंगळवारी (दि.४) विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घरालाआग लागून संसरोपयोगी वस्तू ,धान्य आदी ऐवज जळून खाक झाला. या आगीत सुमारे साडे तीन लाख रु पयांचे नुकसान झाले.तळवाडे दिगर येथील यशोदाबाई बाजीराव ठाकरे यांच्या घराला मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घराला अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी वस्तू, धान्याची पोती, कपडे, कोबी बियाणे, शेतीत लागणारे लहान-मोठी वापरात येणारी अवजारे इत्यादी जळून खाक झाले. या आगीत सुमारे साडे तीन लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.पतीचे दोन महिन्यापूर्वी निधनजमीन दोन एकर, सततच्या बाजारभाव व उत्पादनखर्च या अडचणीमुळे शेती व्यवसायात नेहमी तोटा, पतीच्या निधनानंतर आपल्या या दु:खाचा डोंगर बाजूला ठेवून उदरनिर्वाहासाठी मोठ्या हिमतीने दूध व्यवसायासाठी एक गाय विकत घेतली परंतु दुर्दैवाने पंधरा दिवसातच या दुधाळ गाईचे वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. अशा नैराश्य व बिकट परिस्थितीत पुन्हा ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. (
शॉर्टसर्किटमुळे घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 18:11 IST
सटाणा : तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मंगळवारी (दि.४) विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून संसरोपयोगी वस्तू ,धान्य आदी ऐवज जळून खाक झाला. या आगीत सुमारे साडे तीन लाख रु पयांचे नुकसान झाले.
शॉर्टसर्किटमुळे घराला आग
ठळक मुद्देसटाणा : संसारोपयोगी वस्तू ,धान्य आदी जळून खाक