नाशिक जिल्ह्यातील ग्रंथमित्रांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:00 IST2018-11-22T01:00:16+5:302018-11-22T01:00:34+5:30

कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त  व रसिकरंजन वाचनालय घुमकी, जिल्हा कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्यातील ग्रंथालय चळवळीत मोलाचे योगदान दिलेल्या राज्य शासनाने ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित केलेल्या डॉ. एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्रांचा स्नेहमेळावा व गौरव समारंभ झाला.

 Hospitality felicitations in Nashik district | नाशिक जिल्ह्यातील ग्रंथमित्रांचा सत्कार

नाशिक जिल्ह्यातील ग्रंथमित्रांचा सत्कार

निफाड : कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त  व रसिकरंजन वाचनालय घुमकी, जिल्हा कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्यातील ग्रंथालय चळवळीत मोलाचे योगदान दिलेल्या राज्य शासनाने ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित केलेल्या डॉ. एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्रांचा स्नेहमेळावा व गौरव समारंभ झाला.  यात ग्रंथालय चळवळ वाढीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या नाशिकच्या ग्रंथमित्रांचा सन्मान करण्यात आला. यात ग्रंथमित्र दत्ता पगार नाशिक, काका कोतवाल चांदवड, शांताराम जाधव नांदुर्डी, ता. निफाड, नईमखान पठाण निफाड, राजेश शिरसाठ मखमलाबाद, बाळासाहेब खालकर निफाड आदींचा अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर पवार, सागर खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.  याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष आमदार गंगाधर पटणे, अनिल बोरगामवार, भगवान शिंदे, सोपान पवार, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे तानाजी मगदुमआदी उपस्थित होते.

Web Title:  Hospitality felicitations in Nashik district