शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:02 IST

समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्यावर भीषण अपघात झाला. यामध्ये नाशिकच्या उद्योगपतींचा मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या आलिशान मर्सिडीजचा भीषण अपघात झाला. मर्सिडीज कारने तीनवेळा पलटी मारली आहे, यामध्ये नाशिक येथील उद्योगपती सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पत्नी व दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. 

३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबईहून नाशिककडे ही कार जात होती. समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीने तीन वेळा पलटी मारली आणि सुनील हेकरे हे गाडीतून बाहेर फेकले गेले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, यामुळे जागेवरच मृत्यू झाला. 

अपघातानंतर हेकरे यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. मृत सुनील हेकरे यांचे बंधू अनिल हेकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर अपघाताच्या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे गाडीचा ताबा सुटून अपघात झाला. "महामार्गावरील बांधकामाची गुणवत्ता निकृष्ट असून, अपघातानंतर वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग