गोंदे फाट्यावर भीषण अपघात; एक गंभीर, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 00:17 IST2021-04-14T23:09:07+5:302021-04-15T00:17:19+5:30
नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कंटेनर आणि इनोव्हा कार यांच्या झालेल्या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला असून इनोव्हा कारमधील दोन किरकोळ जखमी झाले. सदर घटना बुधवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली .

गोंदे दुमाला फाटा येथे घडलेल्या अपघातात इनोव्हा कार आणि कंटेनरचे झालेले नुकसान.
नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कंटेनर आणि इनोव्हा कार यांच्या झालेल्या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला असून इनोव्हा कारमधील दोन किरकोळ जखमी झाले. सदर घटना बुधवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली .
गोंदे फाटा येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर (क्र. एन.एल.०२, क्यू.२७६३) चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे दुभाजक तोडून समोरून मुंबईहून-नाशिककडे येत असलेल्या इनोव्हा कारला (क्र. एम.एच.१५, एच.एम.७१४९) जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही वाहने पलटी झाली. या अपघातात कंटेनरचा लखन प्रितम सिंग (३२, रा.पंजाब) गंभीर जखमी झाला. गोंदेफाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेद्वारे जखमी चालकास लेखानगर येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाडिव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी फड यांनी पंचनामा करून महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. महिंद्रा कंपनीचे सुरक्षा अधिकारी हरीश चौबे व अनिल नाठे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. दोन आठवड्यांपासून मुढेगाव ते विल्होळी दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून सुसाट वाहने चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.