मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 05:15 PM2019-09-09T17:15:40+5:302019-09-09T17:19:26+5:30

मानधनवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आशा कर्मचाऱ्यांनी सोमवारी गोल्फ क्लब मैदान परिसरात जेलभरो आंदोलन केले. परंतु, पोलिसांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी आशा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने चार वाहनांच्या ३२ फेऱ्या करून आंदोलन करणाºयांना ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. येथे तब्बल दोन तास महामार्ग बसस्थानकावर बसवून ठेवल्यानंतर सर्व आशा कर्मचाºयांना सोडून देण्यात आले.

Hopefully a jailbreak movement of employees for honorarium | मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

Next
ठळक मुद्देआशा कर्मचाऱ्यांनी केले जेलभरो आंदोलनपोलिसांनी ताब्यात घेऊन केली सूटका अपुऱ्या यंत्रणेमुळे कारवाई लांबल्याने पावसात आंदोलन

नाशिक : मानधनवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आशा कर्मचाऱ्यांनी सोमवारी गोल्फ क्लब मैदान परिसरात जेलभरो आंदोलन केले. परंतु, पोलिसांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी आशा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने चार वाहनांच्या ३२ फेऱ्या करून आंदोलन करणाºयांना ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. येथे तब्बल दोन तास महामार्ग बसस्थानकावर बसवून ठेवल्यानंतर सर्व आशा कर्मचाºयांना सोडून देण्यात आले. 
राज्यात आशा व गटप्रवर्तकांचे मंगळवार (दि. ३) पासून आंदोलन सुरू असून, बुधवारपासून राज्यातील ७५ हजार आशा व १३ हजार गटप्रवर्तकांनी संपूर्ण कामकाजावर बहिष्कार घातला आहे. आशा कर्मचाºयांना शासनाने मानधन तिप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची अंमलबजावणी निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी करण्यात यावी, त्याचबरोबर आशा व गटप्रवर्तकांना शासन सेवेत कायम करावे, तोपर्यंत अंगणवाडी सेविकांइतके मानधन द्यावे या मागण्यांसाठी हे आशा कर्मचाºयांचे आंदोलन सुरू असून, शनिवारी शेकडो आशा कर्मचाऱ्यांनी गोल्फ क्लब मैदानाबाहेर दिवसभर ठिय्या देऊन थाळीनाद आंदोलन केल्यानंतर सोमवारी सुमारे १३४२ आशा कर्मचाऱ्यांनी जेलभरो आंदोनलन केले. आंदोलन काळातच शहरात जोरदार पाऊस सुरू असताना आंदोलकांना पोलिसांनी सुमारे दीड ते दोन तास वाहने उपलब्ध नसल्याने ताब्यात घेतले नाही. त्यामुळे आंदोलनासाठी जिल्हाभरातून दाखल झालेल्या आशा कर्मचाऱ्यांना पावसातच आंदोलन करावे लागले. त्यानंतर ४ वाहनांतून ३२ फेऱ्या करून मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक परिसरातील मैदानावर थांबविण्यात आले. येथेही आशा कर्मचारी महिलांनी सोबत आणलेल्या छत्र्यांच्या आधारेच पावसात उभे राहून आंदोलन केले. सुमारे दोन तासांनंतर आंदोलन करणाºया महिलांची नोंद करून त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, यवतमाळ येथे आंदोलनादरम्यान आशा कर्मचाºयांवर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ आशा कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून मुंबई नाका पोलीस ठाण्यात या घटनेच्या निषेधार्थ निवेदनही दिले. या आंदोलनात आशा व गटप्रवर्तक संघटनेचे राज्याध्यक्ष राजू देसले, सुवर्णा मेतकर, माया घोलप, विजय दराडे, अर्चना गडाख, बेबी धात्रक, दीपाली कदम, वैशाली कवडे आदींसह शेकडो आशा कर्मचारी सहभागी झाले होते.
    

Web Title: Hopefully a jailbreak movement of employees for honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.