आशा, गटप्रवर्तक आजपासून बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST2021-06-16T04:19:56+5:302021-06-16T04:19:56+5:30
आशा सेविकांना घरोघरी जाऊन कोरोना टेस्ट, ॲंटिजन व इतर टेस्ट करण्याची सक्ती करू नये, इतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही ...

आशा, गटप्रवर्तक आजपासून बेमुदत संपावर
आशा सेविकांना घरोघरी जाऊन कोरोना टेस्ट, ॲंटिजन व इतर टेस्ट करण्याची सक्ती करू नये, इतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही शासकीय सेवेत कायम करावे, नागरी विभागातील आशा स्वयंसेविकांना काही नगरपालिकांनी कोरोनासंबंधित काम करण्याबद्दल ३०० रुपये प्रतिदिन भत्ता दिला आहे, तर काही नगरपालिकांनी व जिल्हा परिषदांनी हा मोबदला दिलेला नाही तो त्वरित देण्यात यावा. आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात २००० व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ३००० ची दरमहा कायम व निश्चित स्वरुपाची वाढ केलेली आहे. सदर वाढ बहुतांश जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर २०२० पासून मिळालेली नाही. ती विनाविलंब देण्यात यावी या मागण्यांसाठी सदरचे आंदोलन असून, यासंदर्भात सोमवारी कृती समितीची ऑनलाइन बैठक घेण्यात आली.
यावेळी कृती समितीचे कॉम्रेड राजू देसले, एम. ए. पाटील, आनंदी अवघडे, श्रीमंत घोडके, भगवानराव देशमुख, सुमन पुजारी, नेत्रदीपा पाटील, दत्ता देशमुख, नीलेश दातखिळे उपस्थित होते.