बालमृत्यू कमी करण्यात आशा कर्मचाऱ्यांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 03:03 PM2020-02-29T15:03:58+5:302020-02-29T15:04:04+5:30

कामिनी चारोस्कर : दिंडोरीत आशा दिन साजरा

 Hope employees contribute to reduce child mortality | बालमृत्यू कमी करण्यात आशा कर्मचाऱ्यांचे योगदान

बालमृत्यू कमी करण्यात आशा कर्मचाऱ्यांचे योगदान

Next
ठळक मुद्देबेटी बचाव, स्वच्छता अभियान, स्रीभू्रण हत्या, अंधश्रद्धा आदी जनजागृतीपर पथनाट्य सादर

दिंडोरी : आशा कर्मचारी हे ग्रामीण भागातील जनतेचा शासकीय दुवा आहे. आरोग्य विभागाच्या विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविणे आणि बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत दिंडोरी पंचायत समितीच्या सभापती कामिनी चारोस्कर यांनी व्यक्त केले.
आशा कार्यकर्ता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तालुक्यातील आशा प्रवर्तक यांच्या वतीने आशा दिनाचे औचित्य साधत आरोग्यविषयक, समाजप्रबोधनविषयक रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बेटी बचाव, स्वच्छता अभियान, स्रीभू्रण हत्या, अंधश्रद्धा आदी जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे ,उपसभापती विनता अपसुंदे, सदस्य संगीता घिसाडे, बालविकास प्रकल्प अधिकारी रमेश बनकर, आयटक संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले, जिल्हाध्यक्ष माया घोलप, जिल्हा संघटक शरद नागरे, आरोग्य सहायक माया पांडे, शीतल जगताप, शकुंतला गांगुर्डे, दीपक आहिरे आदींसह आशा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title:  Hope employees contribute to reduce child mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक