कोरोना लढाईत काम करणाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:20 IST2020-11-19T23:11:48+5:302020-11-20T01:20:37+5:30
दिंडोरी : कोरोनासारख्या महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशासेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविकांचे कौतुकास्पद कार्य लक्षात घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका, आशासेविका, गट प्रवर्तक यांना सन्मानित करताना रोहिणी गावीत. समवेत डॉ. सुजित कोशिरे, राकेश कोकणी, सदाशिव गावीत आदींसह महिला.
दिंडोरी : कोरोनासारख्या महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशासेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविकांचे कौतुकास्पद कार्य लक्षात घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
अहिवंतवाडी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावीत यांच्या वतीने गौरवपत्र, साडी देऊन कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी गावीत यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमप्रसंगी पंचायत समिती माजी सभापती आनंदा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गावीत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी, वैद्यकीय अधिकारी डॉ. साबळे, सरपंच पंढरीनाथ भरसट, सुकदेव खुर्दळ, नारायण तुंगार आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.