शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:49 PM2021-02-08T16:49:18+5:302021-02-08T16:55:14+5:30

वाडीव-हे : भारतीय लष्करात १७ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या विजय कातोरे यांचा वाडीव-हे मित्र परीवाराच्यावतीने सेवापुर्ती सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियाचा तसेच उपस्थि जवानांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Honoring the families of the martyred soldiers | शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान

देशासाठी सेवा बजावनारे मेजर दिपचंद यांचा सत्कार प्रसंगी आमदार हिरामण खोसकर, विक्रम नागरे, योगेश शेवरे, गोकुळ घोलप, विजय कातोरे, रामदास धांडे, सदाशिव कातोरे आदिंसह जवान.

googlenewsNext
ठळक मुद्देदेशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.

वाडीव-हे : भारतीय लष्करात १७ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या विजय कातोरे यांचा वाडीव-हे मित्र परीवाराच्यावतीने सेवापुर्ती सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियाचा तसेच उपस्थि जवानांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

वाडीव-हे येथील विजय सदाशिव कातोरे हे जवान लष्कारात १७ वर्ष देशसेवा करून निवृत्त झाले. गावातील मिरवणुकीनंतर त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त देश सेवेत शहिद झालेले जवान तसेच पोलीस दलातील जवान आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेले महाराष्ट्रातील जवानांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार हिरामण खोसकर, गोरख बोडके, नगरसेवक विक्रम नागरे, विलास शिंदे, तुकाराम मोराडे, योगेश शेवरे, नाशिकचे माजी सैनिक संघटना अध्यक्ष फुलचंद पाटील, इगतपुरी तालुका माजी सैनिक संघटना अध्यक्ष पाटेकर, रामदास धांडे, गोकुळ घोलप, विष्णु वारूगसे, वाडीव-हे सरपंच रोहीदास कातोरे, ऊपसरपंच प्रविण मालुंजकर,डॉ.प्रशांत मूर्तडक, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. शहीद जवान एकनाथ खैरनार, शहीद आण्णासाहेब झनकर, शहीद निवृत्ती ढोन्नर, शहिद संदीप ठोक, शहिद केशव गोसावी यांचा तसेच अशोक कातोरे, पोलिस हवादार पहिलवान दिलावर शेख यांंच्या कुटुंबियाचा सन्मानचिन्ह, शाल देवून सत्कार करण्यात आला. यावेळी निलेश जाधव, रविन्द्र राजोळे, आब्दुल इमानदार, संतोष टकले, सोमनाथ वडने, नितीन कुहीले, अमोल महाले, संदिप काळे, अशोक सुडके, अनिल जाधव यांंचाही सत्कार करण्यात आला. राष्ट्रध्वजाची आण-बान-शान राखण्यासाठी भारतमातेच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानाच्या कुटुंंबांचा सार्वजनिक ठिकाणी वावरताना योग्यतो सन्मान ठेवावा असे कारगिल युद्धात ॲापरेशन रक्षकमध्ये कामगिरी करतांना एक हात व दोन्ही पाय गमावलेल्या निवृत्त मेजर दिपचंद यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लोकेश कटारीया यांनी केले.
(०८ वाडीवऱ्हे १, २)

१)
२) वाडीव-हे चे सुपुत्र विजय कातोरे यांच्या सेवापुर्ती निमित्त शहीद जवानांच्या कुटुंबियाचा सन्मान व शहिद जवानांना मानवंदना देतांना लष्करी जवान व परीवार.

Web Title: Honoring the families of the martyred soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.