‘महिला प्रवाशांना सन्मानाची वागणूक द्यावी’
By Admin | Updated: December 23, 2015 22:20 IST2015-12-23T22:17:37+5:302015-12-23T22:20:33+5:30
‘महिला प्रवाशांना सन्मानाची वागणूक द्यावी’

‘महिला प्रवाशांना सन्मानाची वागणूक द्यावी’
नाशिक : खासगी वाहनातून विशेषत: रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिलेला सन्मानाची वागणूक द्यायला हवी, असे प्रतिपादन नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले.
शिवाजीनगर येथील महादेव मंदिर रिक्षा स्टॅण्ड येथील शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना पाटील यांनी, राज्यात दर दिवसाला खासगी वाहतूकदारांकडून महिला प्रवाशांच्या छळाच्या बातम्या कानावर पडतात. मात्र संगळेच चालक दूषित दृष्टिकोनाचे नसल्याने प्रवाशांनीदेखील त्यांच्याप्रती विश्वास दाखवावा. तसेच रिक्षाचालकांनी प्रवाशांच्या मनात विश्वासाचे नाते सुदृढ होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. दरम्यान अमोल पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भारतीय सेवा कामगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन केले. यावेळी संतोष शेवाळे, अमरसिंग पाटील, अशोक येडे, संदीप गिते, राजू वाघ, किरण अरणे, लक्ष्मण जपे, पप्पू राजपूत, सचिन पवार, सचिन जाधव आदिंसह रिक्षाचालक उपस्थित होते.