जळगाव येथे ‘त्या’ पालकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:48 IST2020-01-30T23:06:14+5:302020-01-31T00:48:35+5:30
जळगाव येशील श्री बोल्हाई माता मंदिर ट्रस्टच्या वतीने ज्या घरात तीन ते सहा मुली आहेत अशा पालकांचा सन्मान करून एक अनोखा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

जळगाव येथील पालकांच्या सत्कार समारंभप्रसंगी रतन पाटील वडघुले, परशराम कराड, यादव वडघुले, रामनाथ कराड, जनार्दन वडघुले, नानासाहेब वडघुले, अशोक वडघुले, विजय डेर्ले आदी.
निफाड : तालुक्यातील जळगाव येशील श्री बोल्हाई माता मंदिर ट्रस्टच्या वतीने ज्या घरात तीन ते सहा मुली आहेत अशा पालकांचा सन्मान करून एक अनोखा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
कठीण परिस्थितीत या सर्व मुलींना वाढवलं. मोठं केलं त्या मुलींना स्थिरस्थावर केलं, अशा पालकांना कौतुकाचे दोन शब्द ऐकायला मिळाले. श्री बोल्हाईमाता मंदिराचा पाचवा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर ज्या पालकांना तीन ते सहा मुली आहेत अशा जळगाव येथील पालकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. व्यासपीठावर रतन पाटील वडघुले, परशराम कराड, यादव वडघुले, पंढरीनाथ कराड आदी मान्यवर होते. अध्यक्षस्थानी जनार्दन वडघुले होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी बोल्हाई माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय वडघुले, उपाध्यक्ष युवराज वडघुले, विश्वस्त माधव वडघुले, गणेश वडघुले, नितीन वडघुले, ज्ञानेश्वर वडघुले, भरत वडघुले, विलास वडघुले, सागर वडघुले, बाळासाहेब वडघुले व सचिव सुनील वडघुले यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक परशराम कराड यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर कराड यांनी केले.
जळगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक यादव वडघुले यांनी ही आगळीवेगळी संकल्पना मांडली. ही संकल्पना श्री बोल्हाई माता मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली. या पदाधिकाऱ्यांनी तातडीने ही संकल्पना अमलात आणून कार्यक्र माचे आयोजन करून पुढील पिढीला ‘लेक वाचवा’ हा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.