कामगार कल्याण केंद्रात शहिदांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:23 IST2018-03-25T00:23:02+5:302018-03-25T00:23:02+5:30
येथील महाराष्टÑ कामगार कल्याण केंद्रात शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.

कामगार कल्याण केंद्रात शहिदांना आदरांजली
एकलहरे : येथील महाराष्ट कामगार कल्याण केंद्रात शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशनचे आसाराम शिंदे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पवन राणे, रामचंद्र शिंदे, अनिता पोखळे, मनीषा पवार, विवेक देशमुख, रूपाली जाधव, रजनी चव्हाण, योगिता विधाते आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विवेक देशमुख, आसाराम शिंदे यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या राष्टÑभक्तीची माहिती दिली. प्रास्ताविक रजनी चव्हाण यांनी केले. यावेळी कामगार, विद्यार्थी, महिला उपस्थित होते.