सन्मान लेकीचा लेक वाचवा लेक शिकवा दिंडोरी कोंबडवाडी येथे राबविले अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:29 PM2020-01-05T18:29:14+5:302020-01-05T18:29:35+5:30

वरखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिडोरी तालुक्यातील कोंबडवाडी येथे दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत ‘करूया सन्मान लेकीचा’, ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान राबविण्यात आले.

Honor Lakey's Save the Lake Teach Lake Dindori Kombadwadi Expedition | सन्मान लेकीचा लेक वाचवा लेक शिकवा दिंडोरी कोंबडवाडी येथे राबविले अभियान

दिंडोरी तालुक्यातील कोंबडवाडी जि प शाळेतील विद्यार्थ्यांनी लेक लेक शिकवा अभियान प्रसंगी सरपंच जयश्री कडाळे मुख्याध्यापक जिजाबाई खाडे, नरसिंग बोदरवाड देवानद वाघमारे आदी.

Next
ठळक मुद्देप्रत्येक मुलीच्या घरी जावुन त्यांचे औक्षण केले.

वरखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिडोरी तालुक्यातील कोंबडवाडी येथे दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत ‘करूया सन्मान लेकीचा’, ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान राबविण्यात आले. यात प्रथम गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली. मुलींच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देण्यात आल्या, प्रभात फेरीमध्ये मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचावो बेटी पढाओ, मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. प्रत्येक मुलीच्या घरी जावुन त्यांचे औक्षण केले.
त्यानंतर प्रत्येक मुलीच्या नावाची पाटी दरवाजावर लावली. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक जिजाबाई खाडे यांनी प्रत्येक मुलीच्या आईला शिक्षणाचे महत्व पटवुन दिले.शाळेतील एकूण २७ मुलींच्या घराला पाट्या लावण्यात आल्या. सदर अभियान प्रसंगी वरखेडा गावच्या सरपंच जयश्री कडाळे, माणिक भगरे व ग्रामस्थ उपस्थित होते. या अभियानास गावातुन भरभरून प्रतिसाद मिळाला. शाळेतील शिक्षक नरसिंग बोंदरवाड, देवानंद वाघमारे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
 

Web Title: Honor Lakey's Save the Lake Teach Lake Dindori Kombadwadi Expedition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.