शेतकरी सन्मान, मार्गदर्शन कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:37 IST2020-01-23T23:07:59+5:302020-01-24T00:37:00+5:30
शेतकऱ्यांच्या उत्पादकते सोबतच उत्पन्न वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार येथील तालुका कृषी कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे.

मालेगाव तालुका कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन करताना पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा देसाई, कृउबाचे उपसभापती सुनील देवरे. समवेत नवनाथ निकम, तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, विजय देसाई आदी.
मालेगाव : शेतकऱ्यांच्या उत्पादकते सोबतच उत्पन्न वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार येथील तालुका कृषी कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा देसाई, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणांकडून राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणीसाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार चंद्रजित राजपूत हे आहेत तर समितीत सदस्य सचिव म्हणून तालुका कृषी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या समितीमध्ये कृषी संलग्न तालुकास्तरीय सर्व विभागांच्या अधिकाºयांचा समावेश आहे. शेतकरी मार्गदर्शन कक्षाचा उद्देश उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमास तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, विश्वनाथ निकम, अनुरेखक कन्हय्यालाल ढोडरे, सुनील सोनवणे आदींसह मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक उपस्थित होते.
शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षात कृषी अधिकारी डी.सी. शिंदे यांची जनसंपर्क व मार्गदर्शन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाला भेट देणाºया सर्व शेतकºयांच्या नोंदी ठेवण्यात येणार असून, त्यात त्यांच्या समस्या व अडचणीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तालुकास्तरीय समन्वय समिती दर तीन महिन्यांनी आढावा घेणार आहे.