खेडगाव येथे कोरोना योद्धांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:20 IST2021-01-19T19:29:35+5:302021-01-20T01:20:05+5:30
खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे सुमन पाटील फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

खेडगाव येथे कोरोना योद्धांचा सन्मान
खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे सुमन पाटील फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जागतिक महामारी कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता समाजासाठी आरोग्यविभाग, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस अधिकारी, पत्रकार, आशासेविका यांनी घरोघरी जाऊन योद्या प्रमाणे काम केले. या योध्यांचा सुमन पाटील फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब बाराहाते, पुंडलिक ढोकरे, शांताराम शहा, दीपक सोनवणे, रणजीत परदेशी, सचिन सूर्यवंशी, कैलास शिरसाठ, खालील मान्यवर, वसंत वाघ, माजी जिप समाजकल्याण सभापती सुनील पाटील, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी अनिल ठुबे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम बाराहाते, राजेंद्र उगले, शीतल धुळे ज्योती बाराहाते मोहमद सैयदआदि मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी निलेश बेडेस्कर, ग्रामसेवक सोमनाथ ढोकरे, पोलिस अधिकारी रोहिदास टोपले, खंडेराव डोखळे, निलेश मौले. डॉ. भगत, डॉ. पवार, डॉ.अमोल जाधव, आरोग्यसेवक कमलेश मगर, अंकिता मराठे सर्व मेडिकल स्टोअर्स संचालक आदीसह कोरोना योधांचा सन्मान करण्यात आला.