अपर पोलीस अधीक्षक पोद्दार यांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:03 IST2018-02-28T00:03:46+5:302018-02-28T00:03:46+5:30
मालेगाव : येथील अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्टÑ पोलीस युवा संसद’ प्रकल्पाच्या सफलतेसाठी सातारा येथे सत्कार करण्यात आला.

अपर पोलीस अधीक्षक पोद्दार यांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान
मालेगाव : येथील अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्टÑ पोलीस युवा संसद’ प्रकल्पाच्या सफलतेसाठी सातारा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र विश्वास नांगरे-पाटील उपस्थित होते. महाराष्टÑ पोलीस युवा संसद हा प्रकल्प युवा पिढीला गुन्हे आणि दहशतवादापासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी एक सर्वसमावेशक प्रकल्प आहे. ज्याची संकल्पना व अंमलबजावणी हर्ष पोद्दार यांनी केली होती. दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यामध्ये, तर मागील वर्षी या प्रकल्पाचे आयोजन पश्चिम महाराष्टÑात केले होते. सदर प्रकल्प हा मागील वर्षी राष्टÑीय स्तरावर ‘पोलीस महानिरीक्षक कॉन्फरन्स’ हैदराबाद या ठिकाणी सादर केला होता. यावर्षी पश्चिम महाराष्टÑातील एक हजार ९०० शैक्षणिक संस्था तसेच ४२ हजार विद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला.