‘आयएसआय’चा नाशकात ‘एजंट’ नेमण्यासाठी ‘हनी ट्रॅप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 02:05 IST2020-10-15T22:31:03+5:302020-10-16T02:05:25+5:30
नाशिक: शहरासह देशभरात पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संस्थेद्वारे सोशिल मडियाचा वापर करत विदेशी महिला गुप्तहेरांद्वारे हनी ट्रॅप लावले जात आहे. पाक अशा पध्दतीने ‘एजंट’ तयार करत असल्याचे विधान नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत केले.

‘आयएसआय’चा नाशकात ‘एजंट’ नेमण्यासाठी ‘हनी ट्रॅप’
नाशिक: शहरासह देशभरात पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संस्थेद्वारे सोशिल मडियाचा वापर करत विदेशी महिला गुप्तहेरांद्वारे हनी ट्रॅप लावले जात आहे. पाक अशा पध्दतीने ‘एजंट’ तयार करत असल्याचे विधान नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यांनी नाशिककरांसह संपुर्ण भारतीयांना अशा ‘हनी ट्रॅप’पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
नाशिक शहरामध्ये पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित असलेल्या एका विदेशी महिला एजंटला माहिती पुरविल्याच्या संशयावरु न एचएएलच्या एका कर्मचाऱ्याला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याने एचएएलमध्ये तयार महत्त्वाच्या भारतीय बनावटीच्या विमानांची तसेच प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती त्या विदेशी महिला आयएसआयच्या एजंटला पुरविल्याचे आरोप आहे. दीपक शिरसाठ असे या संशयीत कर्मचायाचे नाव असून तो ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याचे पाण्डेय म्हणाले. तसेच देवळाली येथील स्कूल आफ आर्टिलरीमध्ये छायाचित्रण करताना पकडला गेलेला बिहारचा बांधकाम मजूर संजीव कुमार हादेखील पाकिस्तानच्या एका भ्रमणध्वनीवरील व्हॉटसअॅप क्रमांकाच्या सलमान-अब्राहीम नावाच्या ग्रूपमध्ये जोडला गेल्याचे समोर आले आहे. संजीवकुमार याने प्रतिबंधित क्षेत्राचे काढलेले छायाचित्रे याच ग्रूपमध्ये पाठविल्याचे उघड झाले आहे.