शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर रोडवरून होंडा सिटी कारची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 17:24 IST

नाशिक : शहरात दुचाकींबरोबरच आता महागड्या कारही चोरी जाण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत़ गंगापूर रोडवरील लोकमान्यनगरमधून चोरट्यांनी होंडा सिटी ही महागडी कार चोरून नेल्याची घटना घडली आहे़

ठळक मुद्देपाच लाख रुपये किमतीची कार ; चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : शहरात दुचाकींबरोबरच आता महागड्या कारही चोरी जाण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत़ गंगापूर रोडवरील लोकमान्यनगरमधून चोरट्यांनी होंडा सिटी ही महागडी कार चोरून नेल्याची घटना घडली आहे़

त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी मयूर थेटे यांनी आपली पाच लाख रुपये किमतीची होंडा सिटी कार (एमएच १५, डीएम ४७४६) मंगळवारी (दि़ २८) लोकमान्यनगरमधील शिवगंगा अपार्टमेंटजवळ पार्क केली होती़ चोरट्यांनी ही पार्क केलेली कार चोरून नेली़ या प्रकरणी थेटे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बुलेटची चोरीनाशिक : पंचवटीच्या उदय प्लाझामधील रहिवासी ज्योती देवरे यांची ६० हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड बुलेट (एमएच १५, एफझेड ३१३२) चोरट्यांनी आडगाव नाक्याजवळील पद्मालय अपार्टमेंटजवळून चोरून नेली़ याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविवार कारंजा मोबाइल लांबविलानाशिक : जुन्या नाशिकमधील बुधवार पेठेतील रहिवासी संजय चुंबळे हे मुलीला दुचाकीवरून सोडण्यासाठी जात होते़ त्यांच्या मुलीच्या सॅगच्या बाहेरील कप्प्यात ठेवलेला महागडा मोबाइल चोरट्यांनी चोरून नेला़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पंचवटीत कुटुंबाला मारहाणनाशिक : दहा हजार रुपये त्वरित परत करा असे म्हणून चौघा संशयितांनी तरुणीसह तिच्या आई व भावास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना पंचवटीतील शनिचौकात शुक्रवारी (दि़ ३१) सायंकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी तेजश्री जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित राजेंद्र जाधव, आशा गोवर्धने व त्यांच्या दोन मुलींविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस