दापूर शाळेतील शिक्षकाचा गृहभेटीचा उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 14:52 IST2020-09-06T14:51:39+5:302020-09-06T14:52:28+5:30
सिन्नर: कोरोनाच्या पाशर््वभूमीवर शाळा बंद, पण शिक्षण सुरू या उपक्र मांतर्गत तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांंचे अध्ययन सुकर होण्यासाठी गृहभेटीचा उपक्र म सुरु केला आहे. गृहभेटीची ही शाळा विद्यार्थ्यांना चांगलाच लळा लावत आहे.

सिन्नर तालुक्यातील दापूर येथे विद्यार्थ्यांच्या घरी भेट देवून अध्यापन करतांना शिक्षक गोरक्ष सोनवणे.
सिन्नर: कोरोनाच्या पाशर््वभूमीवर शाळा बंद, पण शिक्षण सुरू या उपक्र मांतर्गत तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांंचे अध्ययन सुकर होण्यासाठी गृहभेटीचा उपक्र म सुरु केला आहे. गृहभेटीची ही शाळा विद्यार्थ्यांना चांगलाच लळा लावत आहे.
विद्यार्थ्यांना वैयिक्तक मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने सोनवणे हे आठवड्यातून किमान 2 दिवस प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या रोजच्या केलेल्या अभ्यासाचा फीडबॅक घेतात. तसेच वैयिक्तक मार्गदर्शन करून अडचणी सोडवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना गृहभेटीतून शाळेचा लळा लागला असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात नियमतिता दिसून येत आहे. दररोजचा अभ्यासही ते व्हाटस अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत आहे. सोनवणे यांनी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना व्हाटस्अॅप ग्रुपला जोडले आहे त्यासाठी गल्लीमिञ,पालकमिञ ही संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे. तसेच 2 विद्यार्थ्यांना डोनेट अ डिव्हाईस उपक्र मांतर्गत स्वत: मोबाईल डोनेट केले आहे. डोनेट अ बुक या उपक्र मातंर्गत 10 विद्यार्थ्यांना गोष्टींची अवांतर पुस्तके उपलब्ध करून दिली आहे. याचबरोबर दरमहाच्या सर्व इयत्तेच्या कृतीपुस्तिका त्यांनी बनवल्या असून राज्यभरातील जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. केवळ गृहभेटीवरच न थांबता सोनवणे हे गुगल मीटचा उपयोग करून पालकांशी व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतात. त्यामुळे त्यांच्या ? री च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन प्रकिया सुलभ झाली आहे. शासनाच्या सुरिक्षततेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे. तसेच त्यांनी स्वत: तयार केलेल्या शैक्षणकि व्हििडओंचा देखील विद्यार्थ्यांना विविध घटक सहज समजण्यासाठी उपयोग होत आहे. दापूर शाळेतील इतर शिक्षकांनीही गृहभेटीचा उपक्र म अवलंबला आहे.
या उपक्र मासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी वैशाली वीर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, डाएट अधिव्याख्याता योगेश सोनवणे, संगिता महाजन, गटशिक्षाणाधिकारी मंजुषा साळुंके, विस्तारअधिकारी राजीव लहामगे, केंद्रप्रमुख प्रतिभा कुडके, मुख्याध्यापक चंद्रकला सोनवणे आदीसह शाळा समतिीकडून त्यांना प्रेरणा मिळत आहे.