ममदापूरला विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:07 IST2020-06-23T16:06:51+5:302020-06-23T16:07:04+5:30
पाठ्यपुस्तक वाटप करतांना फिजिकल डिस्टिन्संगच्या नियमांचे पालन

ममदापूरला विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके
येवला : तालुक्यातील ममदापूर येथील जिल्हा परिषद शिवनेरी नगर वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वाटप करण्यात येत होते. परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे अद्याप शाळा न उघडल्याने शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक वाटप करतांना फिजिकल डिस्टिन्संगच्या नियमांचे पालन करण्यात आले तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपायोजनांबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शनही करण्यात आले. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सचिन गिडगे, शिक्षण तज्ज्ञ धनंजय गिडगे, मुख्याध्यापक जनार्दन उगले यांचे हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वसंत गिडगे, दगूनाना गिडगे, बाबासाहेब उगले, संतोष लांडगे, बद्रीनाथ उगले, ज्ञानेश्वर केरे, वाल्मिक भोकरे आदी पालक उपस्थित होते.