ओझर शिवारात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:48 PM2019-08-09T23:48:33+5:302019-08-10T00:23:00+5:30

घर बंद करून आठ दिवस बाहेर गेल्याची संधी साधात बंद घराचा पत्रा उचकाटून चोरट्यांनी घरात प्रवेश करून टीव्हीसह एकूण चार हजार रुपयांच्या वस्तू चोरून नेल्याची घटना ओझर शिवारातील जाधववाडी येथे घडली.

Home robbery at Ozar Shivar | ओझर शिवारात घरफोडी

ओझर शिवारात घरफोडी

Next

नाशिक : घर बंद करून आठ दिवस बाहेर गेल्याची संधी साधात बंद घराचा पत्रा उचकाटून चोरट्यांनी घरात प्रवेश
करून टीव्हीसह एकूण चार हजार रुपयांच्या वस्तू चोरून नेल्याची घटना ओझर शिवारातील जाधववाडी येथे घडली.
जाधववाडी सुरेश धर्मराज जाधव कुटुंबीयांसह २ ते ८ आॅगस्टदरम्यान घर बंद करून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत त्यांच्या घराच्या उत्तर बाजूकडील पत्रा उचकाटून प्रवेश करून २१ इंची टीव्ही, सेटटाप बॉक्स व मिक्सर अशा एकूण ४ हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्या. जाधव कुटुंबीय घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ओझर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.




पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस नाईक जे.एम. चौगुले करीत आहेत.

Web Title: Home robbery at Ozar Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.