नाभिक समाजाकडून निर्बंधाच्या आदेशाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST2021-04-09T04:15:22+5:302021-04-09T04:15:22+5:30

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सलून व ब्युटीपार्लर व्यवसाय सुरू ठेवण्यास निर्बंध घातले आहे. त्यामुळे नाभिक व्यावसायिकांची दुकाने ...

Holi of Restriction Order from Nuclear Society | नाभिक समाजाकडून निर्बंधाच्या आदेशाची होळी

नाभिक समाजाकडून निर्बंधाच्या आदेशाची होळी

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सलून व ब्युटीपार्लर व्यवसाय सुरू ठेवण्यास निर्बंध घातले आहे. त्यामुळे नाभिक व्यावसायिकांची दुकाने बंद झाल्याने अनेक व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने सकल नाभिक समाज मोर्चातर्फे गुरुवारी (दि. ८) पंचवटी कारंजा येथे राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधाच्या आदेशाची होळी करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सकल नाभिक समाज मोर्चातर्फे गुरुवारी सलूून दुकानांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा निषेध करतानाच दुकाने सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी पंचवटी कारंजा परिसरात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकराने व्यावसायिकांवर निर्बंध लादताना त्यांच्या रोजगाराचा कोणताही विचार केला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सलून व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली तर त्यांच्या उदरनिर्वाहाचाच प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे सर्व सलूनची दुकाने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी करीत सकल नाभिक समाज मोर्चचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बोराडे, गौरव पगारे, राजेंद्र कोरडे, अनंता सोनवणे, अप्पासाहेब सूर्यवंशी, संजय गायकवाड, प्रेम भदाणे आदींनी आंदोलन करीत राज्य सरकारच्या आदेशाची होळी केली.

===Photopath===

080421\08nsk_37_08042021_13.jpg

===Caption===

सलुन व्यावसायावरील निर्बंधाविरोधात आंदोलन करीत शासन आदेशाची होळी करताना सकल नाभिक समाज मोर्चाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बोराडे, गौरव पगारे, राजेंद्र कोरडे, अनंता सोनवणे, अप्पासाहेब  सूर्यवंशी , संजय गायकवाड, प्रेम भदाणे आदीं

Web Title: Holi of Restriction Order from Nuclear Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.