होळीसाठी सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 14:14 IST2019-03-19T14:13:44+5:302019-03-19T14:14:09+5:30
सिन्नर : होळीचा सण आणि त्यानंतर पाच दिवसांनी येणारी रंगपंचमी साजरी करण्यासाठी सिन्नर शहरवासियांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

होळीसाठी सजली बाजारपेठ
सिन्नर : होळीचा सण आणि त्यानंतर पाच दिवसांनी येणारी रंगपंचमी साजरी करण्यासाठी सिन्नर शहरवासियांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.या पाशर््वभूमीवर बाजारात विविध रंगीबिरंगी वातावरण बघायला मिळत आहे. शहरातील विविध दुकानात रंगासाठी पिचकाऱ्याव साखरेचे हार, कपडे खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. लहान बालकांचे आकर्षण असणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. पाण्याची टंचाई बघता रंग खेळण्यासाठी यंदा अनेकांचा भर हा कोरडी रंगपंचमी खेळण्याकडे असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. रंगपंचमीच्या उत्साहामुळे शहरातील बाजारपेठ चांगलीच सजलेली दिसत आहे.